८७व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात , 87 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in pune

८७व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

८७व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात
www.24taas.com, झी मीडिया,साससवड साहित्य नगरी, पुणे

सासवड नगरी. ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होतेय. सासवडच्या क-हा नदीकाठी साहित्याच्या मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे.
८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सासवड सज्ज होतंय. यानिमित्तान सासवडचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे.

पुण्याहून दिवेघाट चढून गेलं की दूरवर पसलेल्या डोंगर रांगा आणि त्यांच्या द-याखो-यात बहरलेल्या चिकू, सीताफळ आणि अंजीरांच्या बागा दिसायला लागतात.पुरंदरच्या याच निसर्गसंपन्नतेमुळे त्याला पुण्याचा कॅलिफॉर्निया म्हटलं जातं.
सासवडची ओळख करून द्यायची तर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. अत्रेंनी आत्मचरित्राला ज्या नदीवरून ` क-हेचं पाणी` असं नाव दिलं तीच ही सासवाड्ची क-हा नदी. अत्रेंनी क-हेचं पाणी हे आत्मचरित्र याच संगमेश्वर मंदिराच्या आवारात बसून लिहिलंय. सासवडमध्ये आज फक्त अत्र्यांचं हे जन्मघरच शाबूत आहे. मात्र त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

अत्र्यांच्या सहवासामुळे सासवडला साहित्यिक वारसा मिळालाय. आणि याच सासवडनगरीला आणखी पावन केलंय ते सोपान महाराजांच्या या समाधी स्थळामुळे.संत सोपान महाराजांची समाधी आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम यामुळे इथे बाराही महिने हरिनामाचा जयघोष ऐकू येतो. सासवडचं पेशवाईशी नातं सांगणारी ही पेशव्यांची कचेरी. बाळाजी विश्वनाथांची समाधी आणि जुने वाड्यांचे हे अवशेष अजूनही त्या काळाची आठवण सांगत उभे आहेत.

अशा या ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि साहित्यिक महत्त्व असलेल्या सासवडमध्ये आता साहित्याचा मेळा भरतोय. क-हेचा काठ या साहित्य संमेलनानंतर आणखी समृद्ध होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 3, 2014, 08:40


comments powered by Disqus