Last Updated: Saturday, January 4, 2014, 08:11
पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. त्याच कऱ्हेच्या काठावरून...