पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, ७ ठार, Accident At NASHIK-PUNE Highway

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, ७ ठार

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, ७ ठार

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
पुणे महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास बोटा शिवारात ट्रक आणि बोलेरो पिक-अपमध्ये भीषण अपघातात ७ जण मृत्युमुखी पडले तर ९ जण जख्मी झाले आहेत. मृतांत ३ लहान मुलांचा समावेश आहे.

अपघातातील वाघे आणि पडवळे या दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे..हे सर्व इगतपुरी तालुक्यातील खेड परदेशवाडीचे रहिवासी आहेत...जखमींना संगमनेर येथील तांबे हाँस्पीटल मध्ये उपचारासाठी हलवण्यात आलय..बोलेरो नाशिकच्या दिशेन तर ट्रक पुण्याच्या दिशेन जात होता. .ट्रक चालकाच गाडीवरील नियंत्रण सुटल्यान हा अपघात झालाय...

मृतांची नावे - पांडुरंग शांताराम वाघे वय - ३५ वर्ष , वनिता वाघे वय - २५ वर्ष , रोहीणी शांताराम वाघे वय - ८ वर्ष , भैरव श्रावण पडवळे वय - ६० वर्ष, काळु भैरव पडवळे वय - २८ वर्ष , सरीता काळु पडवळे वय - ५ वर्ष , आशा काळु पडवळे वय - ८ वर्ष



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 17, 2014, 15:13


comments powered by Disqus