पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तीन ठार, accident in chakan

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तीन ठार

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तीन ठार
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळ वाशी येथे आज पहाटे कार अपघातात तीन जण ठार झाले आहेत. या अपघातात पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोराडे यांचा मुलगा प्रीतम बोराडे याच्यादेखील मृतांमध्ये समावेश आहे.

पुण्याहून नाशिककडे जात असताना कारला अपघात झाला. सकाळी कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले.

नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 22, 2014, 18:21


comments powered by Disqus