विजापूरजवळ अपघातः सांगलीचे १८ भाविक ठार, Accident near vijapur: 18 dead of sangli district

विजापूरजवळ अपघातः सांगलीचे १८ भाविक ठार

विजापूरजवळ अपघातः सांगलीचे १८ भाविक ठार


www.24taas.com, झी मीडिया, विजापूर

विजापूरजवळ खासगी बस आणि जीप यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत १८ प्रवासी जागीच ठार झालेत. दुर्घटनाग्रस्त जीप गुलबर्ग्याहून विजापूरला जात होती.

गाणगापूर येथून देवदर्शनाहून हे भाविक दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास परतत असताना शिंदगी ( जि. विजापूर ) या गावाजवळ हा अपघात झाला. अपघातातील मृत हे जत तालुक्यातील जत, बागेवाडी व कवठेमहाकांळ तालुक्यातील बसाप्पावाडी येथील आहेत.
विजापूरजवळ अपघातः सांगलीचे १८ भाविक ठार

गुरूपौर्णिमेनिमित्त हे सारे प्रवासी देवदर्शनाला गेले होते. खाजगी वाहन आणि बस यांच्यात टक्कर झाल्याने हा अपघात झाला. खाजगी वाहनात २२ प्रवासी होते. त्यातील १४ पुरूष , तीन महिला व एक लहान बालक या अपघातात मृत्युमुखी पडले. इतर जखमीना उपचारासाठी विजापूर येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विजापूरजवळ अपघातः सांगलीचे १८ भाविक ठार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 22, 2013, 21:33


comments powered by Disqus