Last Updated: Thursday, December 26, 2013, 13:36
www.24taas.com, झी मीडिया, पुणेआदर्श सोसायटी घोटाळ्याच्या अहवालावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय़ मुख्यमंत्र्यांचा होता, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.
आदर्श अहवाल कॅबिनेच्या बैठकीत फेटाळण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र आदर्श अहवाल फेटाळल्यानंतर समाजातल्या सर्व स्तरांतून सरकारवर टीका होत आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी सावध पवित्रा घेत आहे.
आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळं अजित पवारांनी अहवाल फेटाळण्याचं खापर मुख्यमंत्र्यांवर फोडल्याचं बोललं जातय. मात्र आता अहवाल फेटाळण्याच्या निर्णयवारून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 26, 2013, 13:36