पवित्र स्थळावर ‘गंदी बातें’ नको - अण्णा, dont talk nonsense in temple - anna

पवित्र स्थळावर ‘गंदी बातें’ नको - अण्णा

पवित्र स्थळावर ‘गंदी बातें’ नको - अण्णा
www.24taas.com, पुणे
नवीन टीम अण्णा आणि भ्रष्टाचारासारखी ‘गंदी बात’ मंदिरात करु नका, असं काल अण्णांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गुरुवारी पुण्यात होते. यावेळी त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. दिल्लीतून परतल्यानंतर अण्णा सरळ गणपतीच्या दर्शनाला गेले होते. देशातल्या भ्रष्टाचाऱ्यांना सदबुद्धी दे आणि देश भ्रष्टाचारमुक्त होऊ दे, असं साकडं अण्णांनी गणपती बाप्पाला घातलं. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणि अचंबित करणारं वक्तव्य यानंतर अण्णांनी पत्रकारांशी बोलताना केलं.

नवीन टीम अण्णा आणि भ्रष्टाचाराविरोधातली पुढची लढाई काय असेल? असा प्रश्न पत्रकारांनी अण्णांना विचारला असता ‘ये गंदी बात पवित्र स्थल पे मत करों’ असं उत्तर दिलं. त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. आता अण्णा नेमकं कशाला गंदी बात म्हणाले हा प्रश्न उपस्थित झालाय. अण्णांची ही उद्विग्नता आहे की आणखी काही हे लवकरच स्पष्ट होईल.

First Published: Friday, September 21, 2012, 08:24


comments powered by Disqus