Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:57
www.24taas.com, सांगलीदुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतक-यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.
दुष्काळ परिस्थिती आणि कर्जाचा डोंगर यामुळे निराश झालेल्या विजयकुमारने आत्महत्या केल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. साडेचार लाखांचं कर्ज घेऊन फुलवलेली द्राक्षबाग पाण्याअभावी वाळली. त्यामुळं यासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न या कुटुंबापुढे निर्माण झाला आहे.
हे संकट आलं असतानाच विजयकुमार बारडोल याने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबापुढेही मोठं संकट उभं ठाकलंय.
First Published: Sunday, March 10, 2013, 16:57