‘स्टंट’च्या प्रयत्नात गाडी रेल्वे रुळावर, अन्...., four wheeler stunt on railway track

‘स्टंट’च्या प्रयत्नात गाडी रेल्वे रुळावर, अन्...

‘स्टंट’च्या प्रयत्नात गाडी रेल्वे रुळावर, अन्...
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

काळ आला होता पण वेळ आली नव्हती... याचा प्रत्यय पिंपरी जवळच्या एका रेल्वे क्रॉसिंगवर आला.

फाटक तोडून एक स्कॉर्पिओ रुळावर आली. त्याच वेळी नेमकं एक इंजिन जात होतं. मात्र, मोटरमननं प्रसंगावधान राखून इंजिन थांबवल्यामुळे मोठा अपघात टळला... देहुरोडहून शिवाजीनगरला जात असताना दळवीनगर क्रॉसिंगला हा प्रकार घडला. दिपक काळभोर हा स्कॉर्पिओचा ड्रायव्हर स्टंटबाजी करत असताना त्याचा स्टिअरिंगवरचा ताबा सुटला आणि त्याची गाडी फाटक तोडून रुळावर घुसली... गाडी बाजुला करेपर्यंत मुंबई-पुणे मार्गावर अनेक गाड्यांचा खोळंबा झाला.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 19, 2013, 22:24


comments powered by Disqus