Last Updated: Sunday, September 1, 2013, 15:01
www.24taas.com , झी मीडिया, पिंपरी पिंपरी-चिंचवडमधील भोसरी इथल्या महापालिकेच्या रुग्णालयात एका गतिमंद मुलीवर महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
प्रमोद मनोहर मांडेकर (वय 28, रा. भोसरी) आणि शैलेश दगडू जाधव (वय 39, रा. भोसरी) या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. यातला मांडेकर हा रुग्णालयाचा सुरक्षारक्षक असून शैलेश जाधव हा रुग्णालयातला कर्मचारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी इथल्या एका पुनर्वसन केंद्रात राहत असलेल्या पीडित मुलीला उपचारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आरोपी सुरक्षारक्षकानं आणि कर्मचाऱ्यानं पीडित महिलेला लिफ्टमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि दोघं तिथून निघून गेले.
त्या दरम्यान पीडित महिलेनं पुनर्वसन अधिकाऱ्यास खाणाखुणा करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पुनर्वसन अधिकाऱ्यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांसह पोलिसांना घटनेबाबत कळविले. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी संबंधित दोघांना शनिवारी रात्री अटक केली. आज त्यांना पिंपरी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असून दोघांनाही चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, September 1, 2013, 15:01