सोनं : २५,२७० ; खरेदीसाठी रांगाच रांगा!, gold price going down

सोनं : २५,२७०; खरेदीसाठी रांगाच रांगा!

सोनं : २५,२७०; खरेदीसाठी रांगाच रांगा!
www.24taas.com, पुणे

सोने चांदीच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळं पुणेकरांनी दागिने खरेदीसाठी एकच गर्दी केलीय. सध्या सोन्याचा दर २५,२७० प्रतितोळा (१० ग्रॅम) झालाय तर चांदीची सध्याची किंमत आहे ४४,१८५ रुपये प्रतिकिलो…

रेशनिंगच्या दुकानाबाहेर जशा रांगा लागतात तशा पुण्यातल्या सराफा दुकानांबाहेर पुणेकरांच्या रांगा लागल्यात. पुणेकर रांगा लावून सोने खरेदी करतायेत. दुकानांबाहेर रांगा लावलेले पुणेकर आपल्याला दुकानात कधी जायला मिळेल या प्रतिक्षेत आहेत. तर दुकानातही दागिने खरेदीसाठी उड्या पडल्यात. नागरिक मोठ्या हौसेनं दागिने खरेदी करताना दिसत आहेत.
सहा दिवसांत सोन्याचे भाव कसे घसरले ते पाहूयात...
 ९ एप्रिल २०१३ - सोनं – ३० हजार १५० रुपये प्रतितोळा
 १० एप्रिल २०१३ सोनं – ३० हजार २५० रुपये प्रतितोळा
 ११ एप्रिल २०१३ सोनं – २९ हजार ९९० रुपये प्रतितोळा
 १२ एप्रिल २०१३ सोनं – २९ हजार ८५० रुपये प्रतितोळा
 १३ एप्रिल २०१३ सोनं – २८ हजार ८०० रुपये प्रतितोळा
 १४ एप्रिल २०१३ सोनं – २९ हजार रुपये प्रतितोळा
 १५ एप्रिल २०१३ सोनं – २७ हजार ५०० रुपये प्रतितोळा
 १६ एप्रिल २०१३ सोनं – २५ हजार २७० रुपये प्रतितोळा

First Published: Tuesday, April 16, 2013, 12:39


comments powered by Disqus