होळी रे होळी : कोरडी होळी साजरी करण्यावर भर!, holi celebration in state

होळी रे होळी : राज्यभर कोरडी होळी साजरी करण्यावर भर!

होळी रे होळी : राज्यभर कोरडी होळी साजरी करण्यावर भर!
www.24taas.com, मुंबई

राज्यभर धुळवडीचा रंगोत्सव सुरू आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. बहुतेक ठिकाणी जागृत नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प अंमलात आणलेला दिसतोय. कोरडे रंग खेळून तरुणाईसह अबालवृद्धही या रंगोत्सवात न्हाऊन निघालेत..

राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. राज्यातल्या १५ जिल्ह्यांतली जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. अशावेळी सामाजिक भान राखत राज्यात धुळवड साजरी केली जातेय. मुंबईकरांनीही धुळवड साजरी करताना पाण्याचा वापर करणं टाळलंय. मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती होती. सोसायट्यांमध्ये अबालवृद्ध तरुण कोरड्या रंगात खेळताना दिसत आहेत. धुळवडीला पाणी नसलं तरी उत्साह कुठंही कमी झालेला नाही. लोकांचा धुळवडीचा उत्साह कायम आहे.

पुण्यातही अनेक ठिकाणी रंगाची उधळण होत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये रंगाची उधळण सुरू आहे. नागपूरमध्ये तर धुळवडीचा उत्साह काही वेगळाच असतो. आबालवृद्ध या रंगोत्सवात रंगून जातात. नागपूरला पारा ४० अंशापर्यंत पर्यंत पोचल्याने धुळवड साजरी करत नागपूरकरांनी वाढत्या तापमाना पासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत नागपूरच्या यंग ब्रिगेडने होळी खेळण्याकरता पाण्याचा वापर टाळला आहे.

First Published: Wednesday, March 27, 2013, 13:59


comments powered by Disqus