Last Updated: Wednesday, April 9, 2014, 11:05
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूरमहायुतीमधील शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार रवी गायकवाड यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जात असताना, उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्याचा प्रयत्न एका पोलिस अधिकार्याने केला. पण उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी या गोष्टीचा तीव्र विरोध करत पोलिस अधिकार्यालाच झापले.
शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मंगळवारी विमानाने सोलापुरात उतरले. तेव्हा विमानतळावर उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर होते.
विमान तळावरुन बाहेर पडत असताना, उद्धव ठाकरेंना एका पोलिस अधिकाऱ्याने अडवून त्यांच्या सोबत आणलेली बॅग तपासण्याचा प्रयत्न केला. पण मिलिंद नार्वेकर यांनी या पोलिस अधिकाऱ्याच्या तपासणीस नाराजी दर्शवत उलट पोलिसालाच `तू खात्यात नवीन आला आहेस का? उद्धवसाहेब कोण आहेत तुला माहिती नाही का?` अशा शब्दांत सुनावलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 9, 2014, 10:55