उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री- राऊत

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:59

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वतः विधानसभा निवडणूक लढवून मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला लगावलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

मनसेचा बालेकिल्ला ढासणार हे समजताच राज नाशिक दौऱ्यावर

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 17:07

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जादू चालणार नाही, हे सर्वच एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी नाशिक येथे ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतंय.

गुजराती विधानावर उद्धव ठाकरे यांचे घुमजाव

Last Updated: Friday, May 2, 2014, 20:42

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले आहे. सामना दैनिकातून गुजराती समाजावर केली होती टीका. त्यानंतर उद्धव यांनी गुजराती वक्तव्यावर पत्रक काढले. यात म्हटलंय, शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला चमत्कार घडवून आणूया. मराठी - गुजराती समाजाची एकजूट अखंड ठेवूया.

मोदींसाठी एकत्र येता, मग महाराष्ट्रासाठी का नाही: उद्धव ठाकरे

Last Updated: Thursday, May 1, 2014, 17:46

गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो

राज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

Last Updated: Thursday, May 1, 2014, 11:08

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

युवराजांनी आधी लग्न करा, मग मोदींवर बोला - सामना

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 07:30

नरेंद्र मोदींच्या लग्नावरून वादंग निर्माण झालेला असतानाच, अखेर शिवसेनेने या वादात उडी घेतली.

तुमच्या रात्रीच्या छंदाचं काय? - बांदेकर

Last Updated: Thursday, April 10, 2014, 11:24

`उध्दव साहेबांच्या फोटोग्राफीच्या छंदावर काही लोक बोलतात. मात्र, तुमच्या रात्रीच्या छंदाचे काय?`, असा जोरदार हल्ला शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी विरोधकांवर चढवला आहे.

नार्वेकरांचा विरोध आणि उद्धव ठाकरेंची तपासणी

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 11:05

महायुतीमधील शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार रवी गायकवाड यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जात असताना, उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्याचा प्रयत्न एका पोलिस अधिकार्‍याने केला.

अमोल कोल्हेंची राज ठाकरेंवर सणसणीत टीका

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 15:13

निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना विरुद्ध मनसे यांचा वाद रंगतोय. या वादात आता शिवसेनेत नव्यानेच प्रवेश केलेल्या अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने उडी घेतली आहे.

झरदारींवर कडाडला ठाकरी आसूड

Last Updated: Friday, April 6, 2012, 09:49

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी हे अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती दर्ग्यावर हाजिरी देण्यास येणार आहेत. पण, या घटनेचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र चांगलाच समाचार घेतला आहे.