अनैतिक संबंधातून पिंपरीत ठेकेदाराची हत्याPimpari- Murder of contractor with doubt liaison

अनैतिक संबंधातून पिंपरीत ठेकेदाराची हत्या

अनैतिक संबंधातून पिंपरीत ठेकेदाराची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. शहरात आज सकाळी एका ठेकेदाराची हत्या करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे त्याच्याच कामगाराने त्याची हत्या केलीय. ही हत्या अनैतिक संबंधांच्या संशयावरुन झाल्याची माहिती मिळतेय.

नरेशकुमार कार्तिक देशलहरी अस मृत ठेकेदाराचं नाव आहे. तर भोलाराम भारती या कामगारानं हत्या केल्याचं समजतंय. हत्येनंतर भोलाराम भारती यानं सांगवी पोलीस स्थानकात येवून स्वत: या हत्येची माहिती पोलिसांना दिलीय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय.

ठेकेदाराच्या डोक्यात फावड्याचा वार करुन ही हत्या केली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी इथल्या बांधकाम कामगार ठेकेदार नरेशकुमार यांच्याकडे भोलाराम सुपरवायझर म्हणून तर त्याची पत्नी सरस्वती कामगार म्हणून कामाला होते. नरेशकुमार आणि सरस्वती यांचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा भोलाराम याच्या कानावर आली होती. काल रात्री नरेशकुमार हा भोलाराम याच्या शास्त्रीनगर इथल्या घरी जेवायला आला होता.

जेवणाला रात्री उशीर झाल्यानं नरेशकुमार यानं रात्री तिथंच मुक्काम केला. त्यावेळी नरेशकुमार पत्नीशी लगट करीत असल्याचं भोलारामच्या निर्दशनात आलं. त्यामुळं संतापलेल्या भोलारामनं ललित याच्या डोक्यात फ़ावड्याच्या दांडक्यानं गंभीर मारहाण केली. डोक्याला वर्मी घाव लागल्याने नरेशकुमार याचा जागीच मृत्यू झाला.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 29, 2013, 20:14


comments powered by Disqus