ऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला, Raju Shetty And Sada Bhau On Sugarcane Farmer Agitation

ऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला

ऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला
www.24taas.com, झी मीडिया, कराड

ऊस दरासाठी आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले गेले आहेत. त्यामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड - चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कराडबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

ऊसदरावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतुकदारांनी रस्त्यावर गाड्या न आणणं पसंत केलंय. दगडफेक आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईक़डे येणा-या दूधपुरवठ्यावर आणि भाजीपाल्यावर परिणाम होतोय. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवण्यात आलेत.

सातारा, सांगली आणि कोल्हापुरातून मुंबईकडे १० लाख लीटर दुधाचा आणि ७०० टनांहून अधिक भाजीपाल्याचा पुरवठा होतो. टँकर अडवल्यामुळे त्यावर परिणाम होणारेय. शनिवारपर्यंत या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर हा पुरवठा रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. मात्र आंदोलनात नुकसान होऊ नये म्हणून वाहतूकदारांनी वाहतूक थांबवल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होणार हे निश्चित आहे.

तसंच कराड चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आलाय. तसंच सांगली-वसगडे, कराड-वीरा मार्गावर आंबेगावजवळ रास्तारोको करण्यात आला.. सांगली जिल्ह्यातल्या ८० टक्के एसटी सेवा बंद असून शहरी विभागात वाहतूक मात्र सुरू आहे. दुसरीकडे ऊस आंदोलनाचा फटका एसटी बस वाहतुकीला बसतोय... तीव्र आंदोलनामुळे कोल्हापूरमधून बाहेर जाणा-या सर्व एसटी बसेस रद्द करण्यात आल्यायत... दुपारनंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन बस सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 28, 2013, 11:24


comments powered by Disqus