ऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला

Last Updated: Thursday, November 28, 2013, 11:24

ऊस दरासाठी आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले गेले आहेत. त्यामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड - चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कराडबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

क्रिकेटच्या पीचपेक्षा काळी माती महत्त्वाची; पवारांना टोला

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 16:32

ऊस दरवाढ आंदोलन आता चांगलंच पेटलंय. हे प्रकरण दिल्लीत जाऊनही काहीच तोडगा न निघाल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यांनी उद्यापासून ४८ तासांचा म्हणजेच दोन दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतलाय.

कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, रूळावर माती

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 14:26

विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.

काटजूंना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा – बाळा नांदगावकर

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 08:03

प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं, असं मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

काटजू! नाक खुपसू नका- शिवसेना

Last Updated: Monday, April 1, 2013, 19:19

काटजूंनी नको त्या विषयात नाक खुपसू नये. खुपसल्यास महाराष्ट्र काय आहे ते त्यांना दाखवून देऊ असं आव्हान शिवसेनेने दिलं आहे.

मराठी माणूसही महाराष्ट्राचा भूमिपुत्र नाही- काटजू

Last Updated: Monday, April 1, 2013, 17:43

मराठीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मराठी जनताही मूळची महाराष्ट्रातली नसल्याचं वादग्रस्त विधान प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केलंय.