विहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हातीSangola Solapur 8 laborer Dead In Well Repairing

विहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती

विहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

सोलापूरतल्या सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय, दुष्काळ ग्रस्त भागात पाण्यासाठी आठ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

सांगोल्यातील वाडेगाव इथं माण नदीत विहीरीची दुरुस्ती करण्यासाठी उतरलेल्या मजुरांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झालाय. 9 मजूर विहिरीत उतरून काम करीत असताना अचानक दोन्ही बाजूची वाळू सरकली आणि 40 फूट विहीर वाळूनं बुजली आणि आठ जन या वाळूच्या ढिगाऱ्याखाली अक्षरश: गाडले गेले.

हा प्रकार दुपारी 1च्या सुमारास घडला. सध्या या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आले आहेत दहा जेसीपच्या सहाय्यानं वाळू उपसण्याचं काम सुरू केलंय. सायंकाळपर्यंत जवळपास ३० फुट खोदाई केल्यावर एका मजुराचा मृतदेह हाती लागला आहे. यानंतर या खोदकामात ऑक्सिजन सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून भोवताली वाळू मिश्रीत माती असल्यानं ती सारखी ढासळत आहे. यातच अंधार पडू लागल्यानं मदतकार्यात अडचणी येवू लागल्या आहेत.

रात्री खोदकाम करता येण्यासाठी दोन्ही बाजूनं फोकसचे उजेडाची व्यवस्था केली असून इतक्या तासानंतर अडकलेले मजूर जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या कामावर असणारे सर्व मजूर हे सावे आणि वाढेगाव या दोन गावातील असून घटनास्थळी मजुरांच्या कुटुंबांचा मोठा आक्रोश सुरु आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 20, 2014, 20:32


comments powered by Disqus