प्रतिभा पाटील, विलासराव यांचे भूखंड वादात - Marathi News 24taas.com

प्रतिभा पाटील, विलासराव यांचे भूखंड वादात

www.24taas.com, पुणे
 
बड्या राजकीय नेत्यांच्या संस्थांना दिलेले भूखंड परत का घेण्यात येऊ नयेत, असा सवाल पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी या संस्थाना पाठवलेल्या नोटिसांमध्ये विचारला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, जयंत पाटील यांच्याशी संबंधित या संस्था आहेत.
 
शैक्षणिक कामासाठी या जमिनी घेण्यात आल्या ख-या मात्र अद्याप त्यांचा वापर झालेला नाही. मुळशी तालुक्यातल्या जांबे गावातल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची कन्या आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या संस्थांना कवडीमोल दरानं या जमिनी देण्य़ात आलेल्या आहेत.
 
मात्र या जमिनींवर साधा बोर्ड लावण्याची तसदीही या संस्थांनी घेतलेली नाही. त्यामुळे शैक्षणिक कामासाठीच या जमिनी का परत घेऊ नयेत, अशा नोटीसा पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी या संस्थांना बजावल्यात.

First Published: Tuesday, June 12, 2012, 17:22


comments powered by Disqus