Last Updated: Saturday, February 18, 2012, 17:16
www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेत पाणीप्रश्नावरुन अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पाणीप्रश्नाबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी गोंधळ घातला.
याबाबत प्रशासन वेळोवेळी मार्ग न काढता आश्वासनांवर बोळवण करत असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केलाय. महापालिकेची सभा सुरु होताच काही विषय मंजूर करण्यात आले. मात्र त्यादरम्यान पाण्याच्या मुद्यावरुन नगरसेवकांनी फाईली सभागृहात भिरकावल्या. त्यामुळे सभा तहकूब करावी लागली.
हा प्रश्न चर्चेने सुटणार नाही, त्यामुळे यावर तोडगा निघणार नाही तोवर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.
First Published: Saturday, February 18, 2012, 17:16