Last Updated: Thursday, February 23, 2012, 21:32
www.24taas.com, पुणे राज्यपाल के. शंकर नारायणन चक्कर आल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. इथल्या ‘केरला भवन’च्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्यपाल आले होते.
या सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान भाषण संपवताना राज्यपालांना चक्कर आली. ते खाली पडणार असताना शेजारी उभ्या असलेल्या पदाधिकाऱ्यानं त्यांना सावरलं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
घटनेनंतर तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. राज्यपालांचं ब्लडप्रेशर तपासून लगेच त्यांना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान राज्यपालांची प्रकृती स्थिर आहे.
First Published: Thursday, February 23, 2012, 21:32