जैन यांचे सगळे घोटाळे बाहेर काढा- अण्णा - Marathi News 24taas.com

जैन यांचे सगळे घोटाळे बाहेर काढा- अण्णा

www.24taas.com, राळेगणसिद्धी 
 
शिवसेना आमदार सुरेशदादा जैन यांना काल मध्यरात्री अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आल्याने उद्या जळगाव बंद करण्याची हाक देण्यात आली आहे.
 
आमदार सुरेश जैन आणि समाजसेवक अण्णा हजारे यांच्यातील वैर फारच जुनं आहे. भष्ट्राचाराच्या विरोधात याआधीही अण्णा हजारे यांनी सुरैश जैन यांच्याविरोधात उपोषण केलं होतं, मुंबईत याआधी दोघांनी एकमेकांविरोधात समोरासमोर उपोषण केलं होतं. त्यामुळे आता सुरेश जैन हे घोटाळ्याच्या प्रकरणात अडकल्याने अण्णा हजारे हे चांगलाच निशाणा साधाणार हे मात्र नक्की.
 

सुरेश जैन आणि त्याचबरोबर असणाऱ्या इतर लोकांची देखील चौकशी करून घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. 'आपण २००३ पासून घरकुल घोटाळ्यात सहभागी असलेल्या सुरेश जैन यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करत होतो. त्याला आता कुठे यश येत आहे', असं अण्णा यावेळी म्हणाले.


 
सुरेशदादा जैन यांना काल मध्यरात्री अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
 
 
 
 

First Published: Sunday, March 11, 2012, 21:16


comments powered by Disqus