Last Updated: Wednesday, March 21, 2012, 15:19
www.24taas.com, पुणे 
पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या गाळीबारप्रकरकणी हायकोर्टानं सरकारला फटकारले आहे. मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय गोळीबार केलाच कसा असा सवाल हायकोर्टानं सरकारला केला आहे.
तसंच गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांवर अजूनही कारवाई का झाली नाही असा सवालही कोर्टानं केला आहे. हायकोर्टानं याबाबतचा अहवाल २७ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
मावळजवळील पवना धरणातून पिंपरी चिंचवडसाठी होत असलेल्या पाईपलाईन शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला होता. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. यात एक महिला आणि दोन पुरूषांचा समावेश होता.
First Published: Wednesday, March 21, 2012, 15:19