दादांचा वादा... नोकरी नाहीच, आश्वासनं ज्यादा

Last Updated: Thursday, August 9, 2012, 21:35

मावळ गोळीबारात ज्या शेतक-यांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं. मावळ गोळीबाराला उद्या वर्ष पूर्ण होतंय. पण अजूनही हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. महापालिकेनं या संदर्भातला चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय.

होय, मी गोळीबार केला - संदीप कर्णिक

Last Updated: Thursday, May 17, 2012, 10:34

राज्यात खळबळ उडवून देणा-या मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांनी चौकशी आयोगासमोर धक्कादायक साक्ष दिली आहे. मावळमध्ये गोळीबाराचे आदेश मी पोलिसांना दिले नव्हते, तर पोलीस अधिका-यांनीच परिस्थितीनुसार गोळीबाराचा निर्णय घेतला, अशी धक्कादायक माहिती संदीप कर्णिक यांनी दिली आहे. दरम्यान, होय, मी गोळीबार केला, असे कर्णिक यांनी सागितले.

मावळ गोळीबार... आदेश नसतानाही गोळीबार?

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 19:42

मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांची चौकशी आयोगासमोर साक्ष आणि उलटतपासणी झाली. या साक्षीमध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

मावळ गोळीबार : ४८ शेतक-यांना जामीन

Last Updated: Thursday, April 5, 2012, 16:09

मावळ गोळीबार प्रकरणी न्यायलयीन कोठडीत टाकलेल्या ४८ शेतक-यांना जामीन मंजूर झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाने साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली आहे.

मावळमध्ये गोळीबार केलाच कसा?- कोर्ट

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 15:19

पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या गाळीबारप्रकरकणी हायकोर्टानं सरकारला फटकारले आहे. मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय गोळीबार केलाच कसा असा सवाल हायकोर्टानं सरकारला केला आहे.

पवनेचं पाणी पुन्हा पेटणार?

Last Updated: Thursday, December 1, 2011, 17:13

बंद पाईपलाईन योजनेचा विरोध करताना मावळमधल्या शेतक-यांनी पवनेचं पाणी अक्षरशः पेटवलं. त्याची धग पुरती कमी झालेली नाही, तेवढ्यातच आता पुन्हा हा मुद्दा पेटण्याची चिन्हं आहेत.