सांगलीतील दुष्काळ जनावरांसाठी जीवघेणा - Marathi News 24taas.com

सांगलीतील दुष्काळ जनावरांसाठी जीवघेणा

www.24taas.com , सांगली
 
सांगली जिल्ह्यातला दुष्काळ आता जीवघेणा ठरू लागलाय. दूषित पाण्यामुळं पाच म्हशींचा मृत्यू झालाय. तर पाच जण अत्यावस्थ झालेत. त्यांच्यावर मिरजेतल्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
पाणीटंचाईमुळे राज्यातल्या अनेक भागात सध्या गुरांचे हाल सुरू आहेत. पाण्याच्या शोधात गुरांना वणवण फिरावं लागतंय. आरग गावातल्या बिरोबा माळ परिसरात मागील तीन दिवसांपासून पाणी आलेलं नव्हतं. त्यामुळे पाण्याचा शोध सुरू होता. तहान भागवण्यासाठी धनपाल वडगावेमधल्या शेतातील पाईप लाईनचं पाणी पिलं गेलं. मात्र त्या पाण्यात रासायनिक खतं मिसळलेली होती. त्यामुळं पाच म्हशींचा मृत्यू झाला तर पाच गावक-यांची प्रकृती खालावली.
 
या ठिकाणी डॉक्टरांचं पथक दाखल झालंय. तसंच पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत. जिल्ह्यातल्या मिरज पूर्व भागाला वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मात्र कोणतीही कायमस्वरूपी योजना कार्यान्वीत होत नसल्यानं, मुकी जनावरं आणि ग्रामस्थांच्या हालअपेष्टा सुरूच आहेत.

First Published: Wednesday, May 2, 2012, 17:58


comments powered by Disqus