राळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात चोरी

राळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात चोरी

राळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात चोरी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रोख रकमेवर डल्ला मारला आहे.

यादवबाबा मंदिर हे अण्णा हजारे यांच्या उपस्थितीनंतर चर्चेत आलं होतं. अण्णा हजारे यांनी सामाजिक तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जेव्हाही आंदोलन केलं आहे.

तेव्हा अण्णा हजारे यांनी यादव बाबा मंदिरातच उपोषण केलं आहे. एवढंच नाही तर यादव बाबा मंदिराच्या बाहेरील हॉलमधील जागेत अण्णा मुक्काम करतात.

अण्णांच्या बोलण्यातून अनेकदा यादव बाबा मंदिराचा संदर्भ असतो, त्यावरून अण्णा हजारे यांच्यासाठी यादव बाबाचं मंदिर एक दैवत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 15:23


comments powered by Disqus