राळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात चोरी

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 15:23

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रोख रकमेवर डल्ला मारला आहे.

अण्णांच्या खरडपट्टीनंतर गोपाल राय यांचा आंदोलनातून काढता पाय

Last Updated: Friday, December 13, 2013, 15:22

व्ही. के. सिंग यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे गोपाल राय यांची चांगलीच खरडपट्टी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढली. त्यांना जनलोकपाल आंदोलनातून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान, अण्णांचे आंदोलन वादाचा आखाडा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

Last Updated: Friday, December 13, 2013, 12:38

जनलोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनाला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला आहे. याआधी आम आदमी पार्टीटे कुमार विश्वास यांनी भेट घेतली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला. अण्णांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता मनसेने पाठिंबा दर्शवून अण्णांची भेट घेण्याचे ठरविले आहे.

अण्णा हजारे यांची भेट टळली, केजरीवाल आजारी

Last Updated: Thursday, December 12, 2013, 09:20

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द झाला आहे. आजारी असल्याचे कारण देत केजरीवाल यांनी राळेगणसिद्धीला जाणं टाळलं आहे. दरम्यान, कुमार विश्वास आणि गोपाल राय आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणला जाणार आहेत.

अण्णा हजारेंनी घेतले कोंडून

Last Updated: Friday, August 10, 2012, 11:30

जनलोकपाल बिल आणि भ्रष्ट्राचाराबाबत लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीहून येथे परतल्यानंतर स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आहे. अण्णांनी कोंडून घेतल्याने ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शुक्रवारपासून ते खोलीतून बाहेर आलेले नाहीत.

अण्णांवर हल्ला, आज राळेगणसिद्धी बंद

Last Updated: Thursday, May 17, 2012, 08:58

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ताफ्यातल्या गाडीवर नागपुरात दगडफेक झाल्याचा निषेध म्हणून आज राळेगणसिद्धीत बंद पाळण्यात येणार आहे. नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

बाळाचं नाव 'लोकपाल', आता बोला !!!!!

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 21:36

सशक्त लोकपालसाठी अण्णांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतो आहे. अण्णांचे राळेगणवासिय त्यांच्या पाठिशी भक्कमपणे आहेत. एकानं तर आपल्या मुलाचं नावच 'लोकपाल' ठेवल आहे. लोकपालवरुन देशभरात अक्षरशः रण पेटलं आहे. सशक्त लोकपाल आणा अशी मागणी अण्णा करत आहेत.

टीम अण्णा राळेगणसिद्धीत

Last Updated: Sunday, October 30, 2011, 09:43

टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण यांनी राळेगणसिद्धीत अण्णांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गाझियाबादमध्ये झालेल्या बैठकीचा व़ृत्तांतही अण्णांना सांगितला. हे सदस्य थोड्याच वेळापूर्वी राळेगणसिद्धीत दाखल झाले.

आमच्यात 'फूट' सब 'झूठ' - अण्णा

Last Updated: Thursday, October 6, 2011, 13:08

टीम अण्णांमध्ये मतभेद असल्याचा खळबळजनक खुलासा न्यूयॉर्क टाईम्सनं केला आहे. भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी पुकारलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्सनं घेतलेली अण्णांची मुलाखत नुकताच प्रसिद्ध झाली.