Last Updated: Thursday, April 24, 2014, 22:08
www.24taas.com, झी मीडिया, पुणे यावर्षीच्या मान्सूनवर `एल निनो`चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचा पावसावरती विपरीत परिणाम होण्याची चिन्हं असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.
सध्या प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी पेक्षा जास्त असल्याले तिथे मान्सूनच्या काळात "एल निनो "चा प्रभाव राण्याची शक्यता आहे..परिणामी देशात यंदा सरासरीपेक्षा मान्सून कमी होण्याची शक्यता तब्बल 33 टक्के तर अत्यंत कमी पावसाची शक्यता 23 टक्के वर्तवली गेली आहे. तर आयएमडीच्या अंदाजानूसार सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता 35 टक्के आहे.
याउलट सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता फक्त 9 टक्के वर्तवली गेली आहे. त्यामुळं भारतीय हवामान विभागाच्या सांगण्यानुसार यंदाचा पावसाळआ अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 24, 2014, 22:07