Last Updated: Sunday, August 12, 2012, 09:59
www.24taas.com,साताराराष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केलीय. पवार साहेब एकदाच काय तो सोक्षमोक्ष करा. मला का डावललं जातय ते स्पष्ट करा,अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी करत पक्षातील एकाधिकारशाहीविरोधात टीकास्त्र सोडलय.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. या बँकेच्या कार्यकारिणी समितीत खासदार या नात्यानं उदयनराजे भोसले यांचा समावेश करावा, अशी मागणी पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे करूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उदयनराजे नाराज झाले आहेत.
याबाबत पवारांकडे विचारणा केली असता स्थानिक नेत्यांनी बसून निर्णय घ्या असं त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे सर्व संचालकांचा पाठिंबा असतांनाही आपल्याला का डावललं जातय असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केलाय. माझ्याबद्दल पक्षातील काही मंडळी कायम जाणीपूर्वक गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही उदयनराजेंनी केलाय.
First Published: Sunday, August 12, 2012, 09:59