Last Updated: Friday, March 1, 2013, 21:37
www.24taas.com, अहमदनगरमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरात झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी अश्लील भाषण केल्याचा तसेच अश्लील हातवारे केल्याचा आरोपावरून अहमदनगरमधल्या जिल्हा सत्र न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी मिळाली आहे.
ही घटना जरी सोलापूरमध्ये घडली असली तरी राज ठाकरे विरोधात अहमदनगरच्या न्यायालयात खटला चालवण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी केली होती.
या मागणीवर काल सुनावणी होऊन राज ठाकरे यांच्या विरोधात अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात खटला चालवण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
First Published: Friday, March 1, 2013, 21:37