राज ठाकरे `त्या` तीन बहिणींच्या गावाला देणार भेट, raj in bhandara, nagpur

राज ठाकरे `त्या` तीन बहिणींच्या गावाला देणार भेट

राज ठाकरे `त्या` तीन बहिणींच्या गावाला देणार भेट
www.24taas.com, नागपूर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपुरात दाखल होत आहेत राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात करत आहेत. या दौऱ्यात ते भंडाऱ्यातील ‘त्या’तीन बहिणींच्या मुरमाडी गावालाही भेट देणार आहेत.

विदर्भाच्या सुमारे १० दिवसांच्या दौऱ्यावर राज आज नागपूरला दाखल होणार असून आपल्या भेटीत पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटी ते घेणारेत. या दौ-यात राज विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा काढणार असले तरीही, या दरम्यान ते फक्त एकच जाहीर सभा घेणारेत. महत्त्वाचे म्हणजे आपल्या दौऱ्यात राज ठाकरे भंडारा जिल्ह्यातील एकाच घरातील तीन अल्पवयीन बहिणींची हत्या झालेल्या मुरमाडी गावाला भेट देणार आहेत.

राज ठाकरे यांची सभा नागपूर आणि अमरावतीत होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. यावेळेस राज ठाकरे कोणाला टार्गेट करणार, कोणाला देणार प्रतिउत्तर याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसापूर्वीच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला खडसेंनीही प्रत्युत्तर दिलं होतं त्यामुळे राज ठाकरें त्यांचाही समाचार घेणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published: Friday, March 15, 2013, 11:29


comments powered by Disqus