राज ठाकरेंचा उर्वरित महाराष्ट्र दौरा उद्यापासून..., Raj Thackeray Maharashtra Tour in Vidharbha

राज ठाकरेंचा उर्वरित महाराष्ट्र दौरा सुरू...

राज ठाकरेंचा उर्वरित महाराष्ट्र दौरा सुरू...
www.24taas.com, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून (शुक्रवार) सुरवात होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात विदर्भामध्ये राज ठाकरे आपला दौरा करणार आहे. राज ठाकरे यांनी फ्रेबुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरवात केली होती. राज ठाकरे यांचा मागील महाराष्ट्र दौरा हा प्रचंड झंझावाती झाला होता. राज ठाकरेंची पहिली सभा कोल्हापूरमध्ये झाली. आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील राजकारणात वादळं उठलं. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेकांवर टीका केली. या टीकेला प्रत्येकानेच उत्तर दिलं.

राज ठाकरेंनी आतापर्यंत चार सभा महाराष्ट्रातील काही भागात घेतल्या आणि त्यानंतर अनेक वादांना तोंड फुटलं. त्यामुळे आता राज ठाकरेंचा पुढील दौऱ्यात काय घडणार याकडेच सगळ्याचें लक्ष लागून राहिले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विदर्भाचा दौरा नागपूरपासून सुरू होणार आहे.


राज ठाकरे यांची सभा नागपूर आणि अमरावतीत होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. यावेळेस राज ठाकरे कोणाला टार्गेट करणार, कोणाला देणार प्रतिउत्तर याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसापूर्वीच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला खडसेंनीही प्रत्युत्तर दिलं होतं त्यामुळे राज ठाकरें त्यांचाही समाचार घेणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published: Thursday, March 14, 2013, 18:40


comments powered by Disqus