Last Updated: Sunday, March 10, 2013, 14:41
www.24taas.com,मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये राज्यात विरोधी पक्ष दिसत नाही, अशी सातत्याने टीका केली. यावर उत्तर मनसेने शोधून काढण्याचा ठरवलंय. कृष्णकुंजवर मनसे आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अधिक आक्रमक होण्याचा निर्णय झाल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची व्युहरचना करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर मनसेच्या आमदारांची बैठक झाली. ही बैठक जवळपास पाच तास चालली. या बैठकीत सरकारला आक्रमकपणे विरोध करण्याची रणनीती आखण्यात आलीय. तसचं आपलं वेगळं अस्तीत्व दाखविण्यासाठी मनसे करील, अशीही चर्चा झाली. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसे सरकारला कोणत्या मुद्द्यावरून धारेवर धरणार, याचीच उत्सुकता आहे.
अर्थसंकल्प अधिवेशनावर आपला वेगळा ठसा दाखवण्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे. प्रथमच अधिवेशनात मनसे आपली वेगळं चूल मांडणार आहे. भाजप-शिवसेना यांच्या सोबत विरोध न करता वेगळी रणनीती मनसे अवलंबणार असल्याचे समजते. त्यासाठी राज यांनी ही बैठक बोलाविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बैठकीत नेमका काय निर्णय झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
First Published: Sunday, March 10, 2013, 14:41