राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल, Restore contempt petition against Raj Thackeray

राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल

राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल
www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवरील आता सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता लागली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका दाखल करून घेतली आहे. राज ठाकरेंच्या भाषणाबाबत एक अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका याआधी फेटाळण्यात आली होती. मात्र, ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे.

गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी न्यायालयाविरोधात वक्तव्य केले होते. न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका खालच्या कार्टात दाखल करण्यात आली नव्हती. त्यामुळे ती फेटाळण्यात आली होती. ही याचिका दाखल करून घेतल्याने या याचिकेवर काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे.

First Published: Wednesday, April 24, 2013, 20:55


comments powered by Disqus