Last Updated: Thursday, April 25, 2013, 12:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेना आणि मनसेच्या स्टार वॉरवर स्वाभिमानी संघटनेच्या नितेश राणे यांनी टीका केलीय. कलाकार केवळ भीतीपोटी
मनसे आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. केवळ आर्थिक कारणांमुळं कलाकारांनी सेना-मनसेची वाट धरल्याची खरमरीत टीका त्यांनी केलीय.
मनसे आणि शिवसेना यांच्यात आता पुन्हा एकदा जुंपली आहे. पण यावेळेस या दोन्ही पक्षामध्ये मराठी कलाकारांवरून जुपंल्याचे दिसून येते. मराठीतील अनेक कलाकार हे शिवसेनेच्या चित्रपट सेनेत आहेत. तर दुसरीकडे आता मनसेही पुढे सरसावली आहे. मनसेतही मराठी कलाकारांची फौज उभी राहते आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात `स्टार वॉर` सुरू झालं आहे.
मराठी सिनेसृष्टीतील मोठ्या कलाकारांनी काल मनसेत प्रवेश केला. यात अभिनेत्री रीमा लागू, आसावरी जोशी, सुहास जोशी, पुरुषोत्तम बेर्डे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच आदेश बांदेकर यांनी शिवसेना चित्रपट सेनेची धुरा हातात घेतल्यानंतर शरद पोंक्षे, दिगंबर नाईक, सुबोध भावे यांनी शिवसेनेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केला होता. मराठी आणि बॉलिवूड कलाकारांना पक्षात घेण्यासाठी दोन्ही पक्षांत नेहमीच स्पर्धा असते, ती आता निवडणुकीच्या तोडांवर वाढली आहे.
First Published: Thursday, April 25, 2013, 12:49