Last Updated: Monday, December 24, 2012, 15:54
www.24taas.com, मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना जबरदस्त धक्का दिला. खराब फॉर्ममुळे त्याच्यावर सर्व स्तरातून टीका होत होती. काही बातम्यांवर विश्वास ठेवला तर पाकिस्तान सिरीजमध्य सचिनचे नाव नसल्यामुळे नाराज होऊन त्याने वन डेला रामराम ठोकला. या महान फलंदाजाबद्दल तुम्हांला माहित नसलेल्या गोष्टी आता आम्ही तुम्हांला सांगणार आहे.
पहिली बॅटसचिन जेव्हा ७ वर्षांचा होता त्यावेळेस त्याची बहिण सविता हिने त्याला कश्मीरवरून एक बॅट आणली होती. सचिनला ही बॅट मिळल्याने तो खूपच खूश होता. हीच बॅट हातात घेऊन तो भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न पाहत होता. सचिनला ही बॅट सर्वात प्रिय आहे.
सचिनची हेअर स्टाइलसचिनने गेल्या काही दिवसांपूर्वी जी हेअर स्टाइल केली होती, ती त्याच्या हेअर ड्रेसरने नाही तर एका ज्योतिषीने करायला सांगितली होती. सचिनच्या ज्योतिषीने अशा प्रकारे हेअर स्टाइल करण्याच सल्ला दिला होता. त्यानंतर सचिनने आपली हेअर स्टाइल बदलली होती.
अनाथ मुलांचा खर्चमुंबईतील एक स्वयंसेवी संस्था अपनालयच्या २०० अनाथ मुलांना सचिनने दत्तक घेतले आहे.
ग्वालियरमध्ये मानलेली बहीणग्वालियरच्या स्टेडियमचे मॅनेजरच्या पत्नीला सचिन आपली बहिण मानतो. अर्चना पुरोहीत असे त्यांचे नाव आहे. जेव्हा कधी तो या शहरात क्रिकेट किंवा इतर कारणांसाठी येतो तेव्हा तो अर्चना पुरोहीत यांना फोन करून त्याच्या प्रकृतीची विचारपूस करतो.
गुडलकसचिन खेळताना आपल्या खिशात नेहमी मरून कलरचा रुमाल गुडलक म्हणून ठेवतो.
चार वर्षांपूर्वीच निवृत्तीचार वर्षांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सचिनला आधार दिला नसता तर चार वर्षांपूर्वीच सचिनने निवृत्ती जाहीर केली असती, असे कर्स्टन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
First Published: Monday, December 24, 2012, 13:18