सचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज,Sachin Tendulkar: Profiling the greatest ODI batsman

सचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज

सचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज
www.24taas.com, मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवारी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वन डे क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घालणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात महान फलंदाज आहे. त्यांच्यासारखा फलंदाज भविष्यात झाला नाही की भविष्यात होणार नाही.

सचिनने आपल्या वन डे कारकीर्दीत ४६३ सामन्यात ४४.८३ च्या सरासरीने १८ हजार ४२६ धावा केल्या. त्यात ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर २०१६ चौकार १९५ उत्तुंग षटकार आहेत.

पक्का मुंबईकर असलेल्या मास्टर ब्लास्टरने आपल्या जादुई खेळीने जगभरातील चाहत्यांना वेड लावलं. मात्र, काही महिन्यांपासून खराब फॉर्मने झगडत असलेल्या सचिनवर अनेक स्तरातून टीका झाली. पण असे असले तरी जगातील क्रिकेटच्या पटलावर १०० शतकं झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. यात ५१ कसोटी तर ४९ वन डे शतकांचा समावेश आहे.

सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाज म्हणून सचिन नेहमी आठवणीत राहील.
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीत एक काळी बाजू म्हणजे तो कर्णधार म्हणून यशस्वी झाला नाही. त्याचा खेळ इतर कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली चांगला बहरला. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी जबाबदारी स्वीकारून त्याच्यावरील दबाव नेहमी दूर केला.
सचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज

वयाच्या १६ व्या वर्षी पाकिस्तान विरुद्ध आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणाऱ्या सचिनने वसीम अक्रम, वकार युनूस या सारख्या घातक गोलंदाजांचा चांगलाच सामना केला. उसळत्या चेंडूने फटका सहन केल्यानंत रक्ताने माखलेल्या टी-शर्टसह त्याने केलेली खेळी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. यावेळी त्याची चिकाटी आणि जिद्द दिसली होती.

त्याने आपल्या कारकीर्दीत जगातील सर्वात घातक गोलंदाजांचा लिलयापणे सामना केला आणि आपली प्रतिभा दाखवून दिली. सचिन तेंडुलकरची विकेट आज ही प्रतिस्पर्ध्यासाठी अत्यंत मोलाची आहे. कोणताही संघाचा सर्वात मोठा अजेंडा सचिन तेंडुलकरची विकेट कशी घ्यायची हा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.
सचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज

क्रिकेटमधील आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीबरोबरच त्याने या वर्षी आपल्या नव्या इनिंगला सुरूवात केली. राष्ट्रपती मनोनीत खासदार म्हणून त्याने राज्यसभेच्या सदस्याची शपथ घेतली. यावेळी त्याने देशातील क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

त्याच्या खराब प्रदर्शनाची मालिका इंग्लडने त्यांच्या देशात टेस्ट आणि वन डेमध्ये भारताला दिलेला व्हाइट वॉशने सुरू झाली. तसाच फॉर्म त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही कायम राहिला.

आपल्या दोन दशकांच्या कारकीर्दीत विक्रम आणि त्याची साथ कायम राहिले. सचिनने काहीही केले तरी रेकॉर्ड होत होते. विक्रमादित्य सचिनने काढला प्रत्येक रन हा एक रेकॉर्ड ठरत होता.

त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात १५ नोव्हेंबर १९८९ रोजी केली. या आधी त्याने १९८८मध्ये आपला लहानपणीचा मित्र विनोद कांबळी याच्यासोबत ६६४ धावांची विक्रमी भागीदारी केली. लॉर्ड हॅरीस इंटर स्कूल स्पर्धेत या दोघांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला.
सचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज

त्याने आपली पहिले वहिले कसोटी शतक इंग्लड विरोधात १९९० मध्ये ओल्ड ट्रफर्ड येथे केले. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १९९१-९२मध्ये सिडनी आणि पर्थमध्ये शतके झळकावली.

ब्रायन लारा याचा नाबाद ४०० धावांचा रेकॉर्ड सोडला तर असा कोणताही रेकॉर्ड नाही की जो सचिन तेंडुलकरने तोडला नाही. वन डे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला क्रिकेटर आहे. त्याने हा भीम पराक्रम ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला. हा क्षण सुप्रसिद्ध टाइम मॅगझीनमध्ये क्रीडा विश्वातील सर्वात महत्त्वाचे क्षण म्हणून गौरविण्यात आला होता.

सचिन तेंडुलकरने टी-२० न खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु, आयपीएलमध्ये काही अविस्मरणीय खेळींमुळे आपणही टी-२० मध्ये दमदार खेळी करू शकतो हे त्याने दाखवून दिले.

मी जेव्हा बॅटिंग करायचो, तसेच काहीसे मला सचिनची बॅटिंग पाहिल्यावर वाटते, असे गौरोद्गार महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी १९९९ काढले होते.

फलंदाजीसोबत त्याने मध्यगती गोलंदाज, लेग आणि ऑफ स्पिनर अशी भूमिकाही त्याने अनेक वेळा बजावली. त्याच्या गोलंदाजीने भारताला अनेकवेळा विजयही मिळून दिले. हिरो कपच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्याने शेवटच्या षटकात केलेली गोलंदाजी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. त्याने घेतलेल्या १५४ विकेट त्याच्या ऑलराउंड कामगिरीचं दर्शन घडवते. कपिल देवनंतर भारताला मिळालेला तो सर्वात यशस्वी ऑलराऊंडर ठरला आहे. काही काळानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे त्याने गोलंदाजी करणे सोडले.

क्षेत्ररक्षक म्हणूनही त्याने आपली कारकीर्द नेहमी चमकदार ठेवली. स्लिपमधील सर्वात भरवशाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्याचा लौकिक होता. त्याने कसोटीमध्ये ११४ तर वन डेमध्ये १४० झेल घेतले आहे.

First Published: Sunday, December 23, 2012, 16:18


comments powered by Disqus