परशुरामांच्या वादात मराठा महासंघाचीही उडी Maratha Mahasangh on Parshuram Controversy

परशुरामांच्या वादात मराठा महासंघाचीही उडी

परशुरामांच्या वादात मराठा महासंघाचीही उडी
www.24taas.com, चिपळूण

चिपळूण साहित्य संमेलनातील परशुरामाच्या वादात आता संभाजी ब्रिगेडपाठोपाठ अखिल भारतीय मराठा महासंघानंही उडी घेतलीय. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाचे चित्र काढून टाकण्याची मागणी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा महासंघान केली आहे.

फोटो काढून न टाकल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. चिपळूण साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाच्या चित्राला विद्रोही साहित्य चळवळीनंही विरोध केलाय. या संमेलनावर साहित्यिकांनी बहिष्कार टाकावा, अशी मागणीही त्यांनी केलीय. कु-हाड हे हिंसेचं प्रतिक असून, परशुराम हा हिंसेचा परमोच्च बिंदू असल्याचं विद्रेही साहित्यिकांचं मत आहे.

सारा देश स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात उभा असताना असा विचार पुढं नेणं, हे प्रतिगामी लक्षण अशी प्रतिक्रिया विद्रेही चळवळीनं दिली आहे.

First Published: Monday, January 7, 2013, 20:05


comments powered by Disqus