Last Updated: Monday, January 7, 2013, 23:53
www.24taas.com, चिपळूणसाहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात गैर काय, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. बाळासाहेबांचं राज्याला मोठं योगदान आहे, असंही ते म्हणाले.
दुसरीकडे साहित्यिकांना टोला लगावताना `साहित्य संमेलनात भांडणं फार असतात`, असं पवार म्हणाले. आपली जायची इच्छा नव्हती, मात्र स्थानिक नेत्यांनी आग्रह केल्यामुळे जाणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर हमीद दलवाई यांच्या घरातून दिंडी काढणं गैर नसल्याचंही पवार म्हणालेत.
First Published: Monday, January 7, 2013, 23:53