साहित्य संमेलनाचा खर्च सव्वाकोटी , marathi sahitya sanmelan in chiplun, ratnagiri

साहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी

साहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी
www.24taas.com, चिपळूण

चिपळूण साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाचा खर्चही आटोक्यात ठेवण्याचा आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येतोय. आतापर्यंत संमेलनावर सव्वाकोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आयोजक प्रकाश देशपांडे यांनी दिलीय.

सुरूवातीपासून साहित्य संमेलनाला वादाची फोडणी बसण्यास सुरूवात झाली. अध्यक्ष निवडीवरून वाद झाला. मात्र, हा वाद क्षमतोय तोवर स्वागताध्यक्ष निवडीवरून झाला. त्यानंतर रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी जलसंपदा मंत्री आणि संमेलन स्वागताध्यक्ष सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केलेत. तर कोणी व्यासपीठाला कोणाचे नाव द्यावे यावरून वाद झाला.

राजीनाम्याची मागणी

काहींनी ग्रंथ दींडी कोठून काढावी, यावर वाद निर्माण केला आणि ही दींडीच रद्द करण्याची वेळ आली. तर पुष्पा भावे यांनी वाद ओढवून घेतल्याने त्यांना बंदीच करण्यात आली. हे वादाच गुऱ्हाळ सुरूच आहे. आजही साहित्य संमेलनावरुन वाद सुरुच आहे. परशुरामाबद्दलची भूमिका स्पष्ट करत साहित्य संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्षा उर्मिला पवार यांनी केलीय. शिवाय मराठी साहित्य संमेलनाची देणगी रद्द करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.

रामदास आठवले यांनीही उडी

तर दुसरीकडे साहित्य संमेलनाच्या वादात आता आरपीआय नेते रामदास आठवले यांनीही उडी घेतलीय. संमेलनाच्या व्यासपीठला दिलेलं बाळासाहेब ठाकरेंचं नाव बदललं तर संमेलन उधळून लावू असा इशारा रामदास आठवले यांनी दिलाय. ज्येष्ठ समिक्षिका पुष्पा भावे यांनी व्यासपीठाला बाळासाहेबाचं नाव देण्याला विरोध केलाय.

First Published: Tuesday, January 8, 2013, 19:04


comments powered by Disqus