Last Updated: Wednesday, April 17, 2013, 11:59
www.24taas.com, नवी दिल्लीअभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. संजय दत्तने मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल केली होती. संजय दत्तच्या या याचिकेवर कोर्टाने संजय दत्तच्या बाजूने निकाल दिला आहे. संजय दत्तने ६ महिने मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. मात्र संजय दत्तला कोर्टाने शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
संजय दत्तला आपल्या सिनेमाचे उर्वरित चित्रीकरण पूर्ण करण्यास वेळ हवा असल्याने त्याने कोर्टाकडे ही मुदतवाढ मागून घेतली होती. संजय दत्तला हा फार मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी जेव्हा संजय दत्तला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर चार आठवड्यात त्याला शरण यायचे होते. मात्र आता पुन्हा एकदा त्याला चार आठवड्याची मुदतवाढ मिळाली आहे.
संजय दत्तला जर आज मुदतवाढ मिळाली नसती तर मात्र त्याला उद्या पोलिसांना शरण जावं लागणार होतं. मात्र आता पुन्हा एकदा दिलासा मिळाल्याने आता जवळजवळ महिन्याभराने संजय दत्तला पोलिसांना शरण जावं लागणार आहे.
First Published: Wednesday, April 17, 2013, 11:02