Last Updated: Wednesday, April 17, 2013, 15:59
www.24taas.com, मुंबई संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांचा दिलासा दिल्यानंतर बॉलीवुडच्या निर्मात्यांनी आनंद व्यक्त केलाय. याबाबत पोलीसगिरी चित्रपटाचे निर्माते राहुल अगरवाल यांनी संजयला मिळालेल्या दिलासाबाबत खूश असल्याचे म्हटलंय. मात्र, काही चित्रपट पूर्ण होऊ शकतात तर सहा सिनेमांचे भविष्य टांगणीला आहे.
संजय दत्तला मिळालेल्या एका महिन्याच्या दिलास्यामुळे काही निर्मात्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकलाय. तर काहींचे कोट्यवधी रुपये बुडीत जंमा आहेत. मात्र, काहींना संजयबरोबरच दिलासा मिळालाय. संजय दत्तच्या नावावर जवळपास डझनभर चित्रपट आहेत. संजूबाबाच्या नावावर बॉलिवूडचे २७८ कोटी रूपये लावले गेले आहेत.
संजय दत्तला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. संजय दत्तने काही चित्रपटांचे काम बाकी असल्याने मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल केली होती. संजय दत्तच्या या याचिकेवर कोर्टाने संजय दत्तच्या बाजूने निकाल दिला आहे. संजय दत्तने ६ महिने मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. मात्र संजय दत्तला कोर्टाने शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
हे चित्रपट पूर्ण होण्याची शक्यता `पी.के.`- डबिंग बाकी
उंगली - डबिंग बाकी
जंजीर - डबिंग बाकी
या सिनेमांच भवितव्य धोक्यातअलिबाग - 2013
मिस्टर फ्रॉड - 2013
जान की बाझी - 2013
पॉवर- 2013
जब जब फूल्स मिले - 2013
चमको चमेली- 2015
First Published: Wednesday, April 17, 2013, 15:59