Last Updated: Monday, December 24, 2012, 15:38
www.24taas.com, पुणेमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अभिनेता अक्षय पेंडसे यांचं दुर्दैवी निधन झालं आहे.
मध्यरात्री १२ च्या सुमारास मुंबईकडे परतत असताना ऊर्से टोलनाक्याजवळ हा अपघात घडला.. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचं नियंत्रण सुटून तो डिव्हायडर ओलांडत अभ्यंकर यांच्या कारवर जाऊन आदळला..
यांत आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचं निधन झालं.. या दुर्देवी अपघातात अक्षय पेंडसेंच्या २ वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला आहे.. तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीचे दोन तारे निखळल्याची भावना व्यक्त होते आहे...
झी मराठी वर सुरू असलेल्या `मला सासू हवी` या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत आनंद अभ्यंकर तर मुलाच्या भूमिकेत अक्षय पेंडसे दोघेही एकत्र काम करत होते.
First Published: Monday, December 24, 2012, 07:16