Last Updated: Thursday, December 12, 2013, 14:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप प्रत्यारोपाचे कामही जोरात चालू आहे. बिग बॉस रिअॅलिटी शो वादाच्या भोवऱ्यात गाजत असताना आता बिग बॉसच्या घरातली भांडणं थेट पोलीसस्टेशनपर्यंत पोहेचली आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली ब्रिटिश-पाकिस्तानी मॉडल सोफिया हयात हिने अरमानबरोबर झालेल्या भांडणाची मुंबईमधल्या सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत तिने अरमानवर मारामारी, शिविगाळ आणि बेसीस्तपणाचा गुन्हा नोंदविला आहे.
सोफियाने सांगितल्याप्रमाणे ही घटना ४ डिसेंबरला घडली. त्या शोचा काही हिस्सा हा बिग बॉसच्या शोमध्ये दाखवण्यात आला होता. परंतु काही भाग प्रसारीत करण्यात आला नव्हता. बिग बॉसचा स्टुडियो लोणावळ्यात असल्यामुळे सांताक्रुज पोलिसांनी ही तक्रार लोणावळा पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केली आहे. त्यामुळे पुन्हा बिग बॉसच घर हे वादाच्या भवऱ्यात सापडले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 12, 2013, 14:22