बिग बॉस ७: गोहर खान पडली एकटी, अन ढसाढसा रडली, ‘Bigg Boss 7’: Gauahar left alone, cries!

बिग बॉस ७: गोहर खान एकटी पडली, अन ढसाढसा रडली

बिग बॉस ७: गोहर खान एकटी पडली, अन ढसाढसा रडली
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बिग बॉस ७ च्या ग्रँड फिनालेला काही दिवस शिल्लक असताना गोहर खान एकटी पडली असून ती गेल्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडली. ती ज्या व्यक्तींनी घरात मित्र समजत होती, त्या व्यक्तींनीच तिला धोका दिला असे तिला वाटत आहे. पण खर पाहिलं तर गोहरने आपला पत्ता योग्य वेळी योग्य रितीने टाकून बाजी मारली आहे.

एका टास्कमध्ये गोहर, एजाझ, संग्राम, अॅण्डी आणि तनिषा या अंतिम पाच स्पर्धकांना सत्य बोलण्यास सांगितले. यावेळी स्पर्धकांना `बिग बॉस`च्या कन्फेशन रूम ऐवजी खुल्या जागेत अन्य स्पर्धकाविषयीचा आपला कबुलीजबाब नोंदविला.

यावेळी घरातील सदस्य त्यांच्या मनातील अन्य स्पर्धकाविषयीच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचा कबुलीजबाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. घरातील सदस्यांच्या मागे त्यांच्या विषयी बोललेल्या गोष्टींचा कबुलीजबाब देण्यास `बिग बॉस` स्पर्धकांना सांगतो. संध्याकाळी गौहर, एजाझ, संग्राम, अॅण्डी आणि तनिषा `लिव्हिंग एरिया`मध्ये जमतात आणि एकमेकांविषयीची मनातील भडास व्यक्त करतात.

यावेळी एजाझ, तनिषा, अॅण्डी आणि संग्राम गोहरबद्दल अनेक गोष्टी बोलतात. या संभाषणात गोहर एकटी पडल्याचे चित्र दिसले. संग्राम, तनिशा, अँडी यांनी गोहरला सर्वात खोटारडी म्हणून टॅग दिला. या घटनेने गोहर खूपच संतापली. गोहरही एजाझ आणि तनिषाला खडे बोल सुनावले. त्यानंतर तनिषा आणि गोहरचं भांडण होतं आणि नंतर संग्रामने तिला समजविण्याचा प्रयत्न केल्यावर ती बेडरूममध्ये जाऊन ढसाढसा रडली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 20:57


comments powered by Disqus