Last Updated: Sunday, January 12, 2014, 14:10
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबईकपिल शर्माचा प्रसिद्ध असा शो असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मधील गुत्थी म्हणजेच अभिनेता सुनील ग्रोवर यानं अचानक गेल्या वर्षी कपिलचा शो सोडला. आता गुत्थी नव्या अवतारात, नव्या शोमधून पुढं येणार आहे.
याच महिन्यात गुत्थी अर्थात सुनील ग्रोव्हरचा नवा कॉमेडी शो सुरू होणार आहे. यात सुनील ग्रोव्हर ‘छुटकी’ नावाची भूमिका साकारणार आहे. याचं प्रोमोचं शूटिंग मागील आठवड्यातच सुनील ग्रोव्हरनं पूर्ण केलंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहिनी आणि सुनीलनं मिळून महिलेच्या या भूमिकेत फेरबदल केले असून तिचं नाव छुटकी ठेवलंय. यातल्या छुटकीचे कपडे आणि हाव-भाव जरी सारखे वाटत असले तरी ते एक नसल्याचं सुनीलनं स्पष्ट केलं.
आतापर्यंत कार्यक्रमाचं शीर्षक ठरलं नसलं तरी कार्यक्रम प्रसारणाची वेळ ही कपिलच्या शोच्या आधी आहे. कपिलचा शो रात्री १० वाजता आहे तर सुनीलचा शो हा साडे आठ वाजता असेल. या शोमध्ये विनोद, व्यंग आणि नाट्याचा समावेश करण्यात आला असून कपिलच्या शोपेक्षा थोडं वेगळेपण दाखविण्याचा सुनील आणि वाहिनीचा प्रयत्न आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 12, 2014, 14:10