आमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार! - Marathi News 24taas.com

आमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार!



www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवुड स्टार आमिर खानचा शो सत्यमेव जयते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आमिर खान रोज एका नव्या अडचणीत सापडत आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी आमिरला माफी मागण्यास सांगितले होते. आता हरिणाची खाप पंचायत त्याच्यामागे पडली आहे.
 
 
आमिर खान याने सत्यमेव जयते या कार्यक्रमात ऑनर किलिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. यात हरियाणातील खाप पंचायतींमुळे अनेक प्रेमी युगुलांना आपले प्राण गमावावे लागले होते किंवा घरातून पळून जावे लागले.
 
आमिर खानने आमची प्रतिमा मलीन केली असल्याचा आरोप करत खाप पंचायतने एक बैठक बोलावली आहे. यात आमिर खान याच्याविरोधात कारवाई करण्यात यावी का यावर निर्णय घेण्यात येणार आहे. आमिर खाप पंचायतीची प्रतिमा मलीन केली, असल्याचे मेहम चौबीसी पंचायतीचे प्रमुख रणबीर सिंह यांनी सांगितले.
 
रणबीर सिंह हे आमिरच्या शो मध्ये सहभागी झाले होते. आमिरने या शोमधून चुकीचा संदेश दिला आहे. आमिर खानचा शो पाहिल्यावर एका व्यक्तीचा फोन आला, तो म्हणाला त्याची तीन वर्षांची नात पळून जाऊन लग्न करणार असे म्हणते आहे. आता तुम्हीच सांगा आमिर अशा प्रकारे आपल्या शोमधून बदल घडवू इच्छित आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
 
 

First Published: Wednesday, June 13, 2012, 18:18


comments powered by Disqus