स्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत - Marathi News 24taas.com

स्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत

www.24taas.com, नवी दिल्ली  
 
आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर विषय मोठ्या सामंजस्यानं हाताळला होता. हाच विषय राज्यसभेत मांडण्यासाठी आमिरला आमंत्रण देण्यात आलंय आणि आमिरनं ते स्विकारलंही आहे.
 
आमिर खानने सत्यमेव जयतेच्या पहिल्या भागात स्त्रीभृण हत्यांसाठी समाजाबरोबर काही डॉक्टर्सचंही पोस्टमॉर्टेम केलं होतं. पण काही डॉक्टरांना मात्र हे रुचलं नाही, त्यांनी आमिरवर जोरदार टीका केली. मात्र, याच विषयावर भाष्य करण्यासाठी आमिरला निमंत्रण देण्यात आलंय.  भारतीय जनता पक्षाचे खासदार शांता कुमार यांनी आमिरला हे आमंत्रण दिलंय. आमिरनंही चालून आलेल्या या संधीचा स्विकार केलाय. यामुळे आता तो बुधवारी वैद्यकीय क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूकीवर राज्यसभेत बोलताना दिसेल.
 
संसदीय सदस्य नसतानाही आमिरला ही संधी मिळाली, हे विशेष. सत्यमेव जयते या कार्यक्रमात आमिरनं समाजातील कधी कधी लपवल्या जाणा-या तर कधी कधी उघडपणे समोर येणा-या अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकलाय. त्यामुळेच तो आता राज्यसभेतही दिसेल.
 
.

First Published: Wednesday, June 20, 2012, 15:02


comments powered by Disqus