Last Updated: Thursday, July 12, 2012, 11:30
www.24taas.com, मुंबई आमीर खान प्रोडक्शननिर्मित 'सत्यमेव जयते' हा पुन्हा एकदा वादात सापडलाय. ‘ज्यांना दारु प्यायची असेल त्यांनी थोडी थोडी प्या’ हे आमीरचं वक्तव्यं आता चर्चेचा विषय ठरलंय.
विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा आमीरचा ‘सत्यमेव जयते’ पहिल्या भागापासून चर्चेत राहिलाय आहे. काहींना तो खूपच पसंत पडलाय त्यातील मुद्दे तर त्याहून महत्त्वाचे ठरलेत. पण, काहींना मात्र आमीरची वक्तव्यं रुचत नाहीत. खाप पंचायत आणि डॉक्टरांनंतर आता शासनाच्या नशाबंदी मंडळाने आमीरचा निषेध केलाय. गेल्या भागात आमीरनं व्यसनमुक्ती या विषयाला हात घातला होता. यावेळी आमीरनं दारु पिणाऱ्या लोकांना सल्ला देताना म्हटलं की ‘ज्यांना दारु प्यायची असेल त्यांनी थोडी थोडी आणि सांभाळून काळजीपूर्वक घ्या’.
आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय, तर आमीरच्या या वाक्याला हरकत घेताना शासनाच्या नशाबंदी मंडळाचं म्हणणं आहे की, आमीरनं एकप्रकारे दारुचं समर्थनच केलंय. दारुचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करणं योग्य नाही अशी भूमिका नशाबंदी मंडळानं घेतलीय. याबद्दल या चुकीच्या वक्तव्याबद्दल आमीर खाननं पुढच्या भागात माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
First Published: Thursday, July 12, 2012, 11:30