पुढचं पाऊलमध्ये कल्याणीचं काय होणार? - Marathi News 24taas.com

पुढचं पाऊलमध्ये कल्याणीचं काय होणार?

www.24taas.com
 
पुढचं पाऊल या मालिकेत अजूनही रुपा आणि कांचनमालाची कारस्थानं सुरुच आहेत. आणि आता तर पूजाही त्यांना यात साथ देते आहे. त्यांनी आता कल्याणी विरूद्ध रचलं आहे नवीन षडयंत्र. कल्याणी-सोहम, रोहित-रुपा आणि यश-पूजा सगळेच पिकनिकसाठी बाहेर आले आहेत.
 
आणि तिथेच रुपा आणि पूजाने रचलाय एक डाव. कल्याणीचे रिपोर्ट्स कांचनमालाने बदल्याचं सत्य रुपा पूजाला सांगते. तर सोहम आणि कल्याणी मात्र, या सत्यापासून अनभिज्ञच आहेत. त्यामुळे आता ही बातमी सोहमपर्यंत कशी पोहोचवायची ही चिंता आक्कासाहेबांना भेडसावते आहे. आणि इथेच येतो मालिकेत एक ट्विस्ट.
 
वेटर बनून चिंतामणी सोहमपर्यंत सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आता सोहम ते ग्रिटिंग कार्ड वाचणार का? कल्याणीचे रिपोर्ट्स खोटे असल्याचं सोहमला कळणार का? मालिका आता काय नाट्यमय वळण घेणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. सो जस्ट वेट अँन्ड वॉच...
 
 
 

First Published: Thursday, March 29, 2012, 18:14


comments powered by Disqus